हवं ते मिळण्यातलं सुख
आपली इच्छा, आपले प्रयत्न, आपले बळ, अनुकूल परिस्थिती, इतरांचे सहकार्य असं सर्व जुळून आलं की, आपण आणि आपल्या इच्छेचं साधन यांच्यात तात्पुरता बंध तयार होतो.
उदा. आपण आणि आंबा यांच्यात, तो आंबा आपण खात असताना, चाखत असताना एक प्रकारची संलग्नता निर्माण होते.
काही वेळानं आपलं समाधान होतं.
आपल्यातली संलग्नता संपते.
मग आंबा आपल्याला ताप्तुरता नकोसा होतो.
