इच्छापूर्ती
मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यावर तिच्या पूर्तीची ओढ आपल्याला लागते.
आपले सर्व शारिरीक, मानसिक, बॊध्दिक बळ एकवटून आपण आपल्याला हवं ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
या अनुभवातून एक कळत की-
- एखादी गोष्ट आपल्याला लगेच मिळते.
- काही गोष्ट मिळायला वेळ लागतो.
- काही गोष्टी मिळवता येणं अशक्य असतं.
आपली इच्छा आणि ती पूर्ण होणं यामध्ये
- लागणारा वेळ,
- आपले प्रयत्न,
- साधनांची उपलब्धता,
- परिस्थिती,
- इतरांचं सहकार्य
असे अनेक महत्वाचे अडथळे असतात.