थेरपीस्टच्या व्यावसायिक जबाबदार्या
1) आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला थेरपीस्टनं आपल्या अनुभवानुसार मदत करावी.
2) कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या पेशंटवर लादू नये.
3) कोणत्याही उपदेशाच्या पालनाचा आग्रह धरू नये.
4) जर एखाद्या कामाचा पुरेसा अनुभव नसेल, प्रशिक्षण नसेल, आत्मविश्वास वाटत नसेल तर त्या व्यक्तीला थेरपीस्टनं इतर समव्यावसायिकाकडे पाठवावं.
5) आपल्या कामाच्या नोंदी वेळच्या वेळी कराव्यात.
6) आपल्याकडे थेरपीसाठी आलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक माहितीविषयी गोपनीयता बाळगावी.
7) समाजशिक्षणासाठी केलेल्या लेखनात व्यक्तींचा उल्लेख करायचा असला तर नावं बदलावं अथवा संक्षिप्त नावांचा उल्लेख व्यक्तींच्या परवानगीनं करावा.
8) आपल्याकडे विश्वासानं आलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणासाठी लैंगिक अथवा आर्थिक गैरफायदा घेऊ नये.