थेरपीच्या कामामध्ये शिस्त पाळणं महत्वाचं असतं.
थेरपीमध्ये -

  • एक सुरुवात असते,
  • पेशंट बरोबर एकत्रित प्रवास असतो,
  • आणि एक शेवट असतो.

थेरपीस्ट व मदत घेण्यासाठी आलेली व्यक्ती यांची पहिली भेट खूप महत्वाची असते.

या भेटीत जर दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं तर कोणत्या प्रकारचं काम करायचयं, ते किती कालावधीचं असणार आहे याचा तपशील ठरवावा.

थेरपीचा शेवट केव्हा, कोणत्या टप्प्याला करायचा याविषयी दोघांनी पुरेशा मोकळेपणानं बोलावं. फ़ीविषयी मोकळेपणानं बोलून ठरवावं.

थेरपीसाठी दिलेली वेळ स्वत: थेरपीस्टनं आणि व्यक्तीनं पाळावी.