थेरपीस्ट व पेशंट हे सहप्रवासी
सहप्रवासी म्हणूनच थेरपीस्ट आपल्या क्लायंटला माझ्यासारखा एक माणूस म्हणून स्वीकारू शकतो.
माझ्या क्लायंटच्या मनात येत असलेल्या त्याला भयंकर वाटणार्या भावना, माझ्याही मनात कधी काळी आल्या होत्या, ही जाणीव त्याच्यामध्ये सहसंवेदना निर्माण करते.
थेरपीस्टमधील सहसंवेदनेचा उपयोग, क्लायंटला हुरुप वाटायला व स्वत:वर निर्धाराने काम करताना होतो.
कडक मास्तर, घाबरलेला विद्यार्थी असं पारंपारिक, काल्पनिक नातं विरत, सहप्रवाशांचं सुरेख नातं दोघांमध्ये निर्माण होऊ शकतं.
दोघांमधील परस्परविश्वास, पारदर्शकता, कामावरची निष्ठा यामुळे निर्माण झालेलं नातं क्लायंटला स्वतःशी असं नातं बनवायला शिकवतं, नंतर असंच नातं महत्वाच्या जवळच्या व्यक्तींबरोबर तयार करायला शिकवतं.
थेरपीस्टचं ऑफिस हे नेट प्रॅक्टिसचे मैदान असते. एकदा आत्मविश्वास आला की बाहेरील व्यक्तींशी व्यवस्थितपणे बोलणं-वागणं शक्य होतं.