थेरपीस्टची वेळ ठरवताना काय करावं?
थेरपीस्टची वेळ ठरवताना :
- आधी, क्लिनिकची व थेरपीस्टची पुरेशी चॊकशी करावी.
- फ़ोनवर बोलताना सुरुवातीला आपली थोडक्यात माहीती सांगावी.
- आपल्याला नेमकी कशासाठी मदत हवी आहे ते स्पष्ट करावं.
- जी माहिती मिळेल त्यावरून थेरपीस्ट आपल्यासाठी योग्य आहे ना याचा अंदाज बांधावा.
- योग्य वाटल्यास थेरपीस्टची वेळ ठरवावी.
- क्लिनिकचा पत्ता नीट विचारून घ्यावा.
----------------------------------------------------------
प्रत्यक्ष जाण्यापूर्वी
- मनाची तयारी पुरेशी करावी.
- आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे ते आठवावं.
- वाटलं तर एका कागदावर थोडक्यात लिहावं (आपल्याला होणारा त्रास कशा स्वरुपाचा आहे, किती दिवस तो चालू आहे, त्यावर आपण कोणती ट्रीटमेंट घेतली, आपले भविष्यातले प्लॅन्स कोणते आहेत ते जाणावं).
-------------------------------------------------
- क्लिनिकवर वेळेवर पोचावं.