पेशंटच्या मनातील प्रश्न
थेरपीला येण्यापूर्वी पेशंटच्या मनात असे विचार चालू असतात..
कोणाची मदत घ्यायची:
- मानसशास्त्रातील तज्ञ की मनोविकार तज्ञ,
- त्यांना कोठे शोधायचं?
----------------------------------------------
काय सांगायचं?
- मी काही सांगायचं की त्यांना विचारू द्यायचं,
- कोठून सुरूवात करायची,
- कागदावर थोडं लिहावं का?
- मला नीट सांगता येईल का?
--------------------------------------------------
माझं ऎकून ते काय म्हणतील?
- मला नावं ठेवतील का?
- रागावतील का?
- त्यांना सर्व खरं सांगायचं की थोडं हातचं राखायचं?
------------------------------------------------
इतरांचा विचार -
- मी येऊन गेल्याचं इतरांना कळलं तर?
- बरोबर कोणाला न्यावं की एकटंच जावं?