कडेकोट किल्ला
डॉ. फ्रॉईड यांनी अंतर्मन जपणार्या किल्ल्याची अनेक प्रकारची आयुधं वर्णन केलेली आहेत.
-उगाचच हसणं
-सतत बोलत रहाणं
-खोट बोलणं
-सबबी सांगणं
-संदर्भ सांगणं
-कारण देणं: कंटाळा आला, डोकं दुखतंय इ.
-नकार देणं-माहित नाही, जमत नाही, आठवत नाही इ.
-उलट-सुलट बोलणं
-कांगावा करणं, आरडओरडा करणं
-रडणं, अजीजी करणं, मुकाट्यानं ऐकणं
-परनिंदा करणं, आळ घेणं
-चोरी करणं
-मोठेपणाचा बाऊ करणं
-देखावा करणं
-वड्याचं तेल वांग्यावर काढणं - दुसर्यावर राग काढणं
- स्वतःवर राग काढणं
- मनातल्या भावना व्यक्त न करणं-कोरडेपणा-अलिप्तता ठेवणं
- माझ्यावर कशाचाही परिणाम होत नाही असं भासवणं.