बहिर्मनाचा बुरखा
मन प्रत्येकाला असतं. आपल्या मनाचे किमान ३ पापुद्रे असतात.
१) बहिर्मन
२) किल्ल्याची भिंत
३) अंतर्मन
आपलं बाह्य मन समाजात वावरण्यासाठी योग्य असं वर्तन दाखवण्यात वाकबगार असतं. तो आपला एक बुरखाच असतो. जगण्याच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ही कला शिकावी लागते.
प्रत्येक लहान मुल हे शिकतं की त्याला जसं वाटतं तसं वागुन-बोलुन चालत नाही. आसपासची माणसं कधी पापी घेतील आणि कधी रागवतील याची काही खात्री देता येत नाही.
त्यामुळे ते आजुबाजुचा अंदाज घेत बोलत-वागत जातं. त्यातून प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्व बनत जातं.
मॅनर्स-एटिकेटस हा बुरख्याचा महत्वाचा भाग. पण हा बुरखा अवेळी फाडण्याचं अघोरी कृत्य करून चालत नाही. युक्ती-प्रयुक्तीन हा पडदा पेशंटकरवी उघडला जातो तो थेरपीस्टच्या धीर धरण्यानं.