निदानाचा अडसर
सुरूवातीच्या भेटीमध्ये थेरपीसाठी आलेल्या किंवा आणल्या गेलेल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा त्रास आहे हे समजणं मी महत्वाचं मानते.
त्यानंतर मात्र त्या व्यक्तीच्या निदानाचा पडदा बाजूला करून ती माझ्यासारखंच एक माणूस म्हणून तिच्याकडे मी बघते.
मी डॉक्टर, थेरपीस्ट म्हणून ग्रेट आणि ती अमुक निदानाची पेशंट म्हणून खालच्या पातळीची, हा भाव थेरपीसाठी आलेल्या माणसाच्या आंतरिक परिवर्तनाच्या प्रवासामध्ये मोठा अडथळा होऊ शकतो.
पेशंटनी काय करावं, कोणते निर्णय घ्यावेत हे सांगण्याचा थेरपीस्टला अधिकार आहे, तिलाच फक्त पेशंटचं हित समजतं अशा प्रकारच्या समजुती थेरपीस्ट व पेशंट दोघांच्या दृष्टीनं घातक आहेत कारण त्या वास्तवावर आधारलेल्या नाहीत.