मन:शांती मिळवून देणारे उपलब्ध पर्याय:

आधुनिक वैद्यकातील तपासण्या, औषधं-उपचार याच्या जोडीला आयुर्वेद, होमिओपॅथी, रेकी, हास्यक्लब, हठयोग, जिम, मसाज, नेचरोपॅथी, संमोहनशास्त्र असे अनेक पर्याय लोकांपुढं उपलब्ध असतात.

याकडे जाणारा आणि त्याद्वारा आपल्याला हवा तो फायदा करुन घेणारा मोठा वर्ग आहे. याशिवाय विविध तत्वज्ञानी व्याख्यात्यांच्या व्याख्यानांना जाणारा, जागतिक विचारवंतांचं लेखन वाचून आपल्याला समाधान मिळेल असं उत्तर शोधणारा बुद्धिमंतांचा वर्गही आहे.

गेली काही वर्ष नियमितपणे वारीत सहभागी होणार्‍या पांढरपेशी स्त्री-पुरुषांची संख्या वाढताना मी बघते आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या प्रार्थनास्थळी वर्षभर गर्दी होत असलेलीही दिसते आहे.

मानसिक अशांति जेवढी जास्त व्यापक आणि खोलीची, तेवढे मानसिक शांतिची हमी देणारे पर्यायही हाताशी. ज्याला जो आवडेल, रुचेल तो त्यानं घ्यावा.

सायकोथेरपी हा पाश्चिमात्य मानसशास्त्राने पुढं ठेवलेला एक पर्याय आहे.