काहीजणं असं म्हणतात की- "कोणापुढं तरी रडगाणं गाण्यापेक्षा आणि पश्चाताप करुन घेण्यापेक्षा जे चाललंय ते ठीक चाललंय. कदाचित हेच दु:ख माझ्या नशीबी लिहिलं असेल".

"या माझ्या प्राक्तनाला मागच्या जन्माची माझी वाईट कर्मच कारणीभूत असतील. हे भोग भोगूनच संपवायचे. मीच दुदैवी त्याला दुसरं कोण काय करणार? तेव्हा पुढं जे होईल ते होईल. माझं दु:ख माझ्या मनात ठेवावं हे बरं."

काही जणं असं सांगतात की ``मला आत्ता काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी मजेत आहे. त्यावेळी थोडा त्रास होत होता. आता छान चाललंय".