सायकियाट्रिस्टची मदत:

  • भास होणं,
  • काळावेळाचं भान कमी होणं,
  • अतिशय संशय वाटणे,
  • मारणं, चावणं, फेकाफेकी करणं,
  • आत्महत्येचे प्रयत्न केले जाणं,
  • स्वत:ची दैनंदिन स्वच्छता न करावीशी वाटणं,
  • वारंवार हिंसेचे विचार मनात येणं,
  • स्वत:ला किंवा इतरांना शारिरीक, मानसिक, लैंगिक क्लेश करण्याचे प्रयत्न करणं,

अशा प्रकारचा त्रास होणार्‍या माणसांना मानसोपचार तज्ञांची मदत लागते. काही व्यक्तींना दीर्घकाल मानसोपचाराची गरज असते आणि शिवाय कुटुंबाची/संस्थेची/स्व-मदत गटाच्या विशेष सहाय्याचीही गरज असते.
------------------------------------------------------
अशा व्यक्ती कशा असतात? -

  • दारूचे न सुटणारे व्यसन असणार्‍या व्यक्ती,
  • सिगारेटचे-तंबाखूचे न सुटणारे व्यसन असणार्‍या व्यक्ती,
  • इतर अंमली पदार्थांचे व्यसन असणार्‍या व्यक्ती,
  • स्किझोफ्रेनिया या मनोविकारानं त्रस्त व्यक्ती,
  • गंभीर औदासिन्य असणार्‍या व्यक्ती,
  • आत्महत्येचे प्रयत्न करणार्‍या व्यक्ती,
  • स्वत:ला वारंवार इजा करुन घेणारी व्यक्ती,
  • मतिमंद व्यक्ती,
  • आत्ममग्न (ऑटिझम),
  • सैरभैर चित्त असणार्‍या व्यक्ती (अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर),
  • इतरांना शारीरिक दुखापत करणारी,
  • इतरांची हिंसा करणारी व्यक्ती,
  • इतरांचा मानसिक छळ करणारी व्यक्ती,
  • सार्वजनिक जागी नियमबाह्य वर्तन करणारी व्यक्ती,
  • इतरांचे लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्ती