अतितीव्र पण आटोक्यात येऊ शकणारा त्रास
त्रास अशा प्रकारे दिसू शकतो-
- खूप अस्वस्थ असणं,
- नासधूस करणं,
- आरडाओरड करणं,
- खूप भीती वाटणं,
- अंगावर धावून जाणं,
- सूड घ्यावासा वाटणं,
- तीव्र असूया वाटणं,
- वारंवार आजारी पडणं,
- काही न सुचणं,
- खूप संतापणं,
- काही न करता एकटं बसून-पडून रहाणं,
- सारखं रडू येणं,
- वारंवार नापास होणं/अचानक नापास होणं,
- कशातच लक्ष नसणं,
- कोणाशीच न पटणं,
- कोणाशीच न बोलणं,
- वजन खूप कमी होणं,
- खूप वजन वाढणं,
- मृत्यूची सतत भीती वाटणं,
अशा माणसांना विशेष सहाय्याची गरज गरज लागू शकते. कधी कधी कुटुंबीयांची मदतही घ्यावी लागते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व मनोबलाचा विचार करून योग्य ती मदत केली जाते.