थेरपीसाठी 'आणलं' जाणार्या व्यक्ती
विशेष सहाय्याची गरज:
थेरपीसाठी 'आणलं' जाणार्या व्यक्ती या दुसर्या प्रकारच्या गटात मोडतात. यांना त्यांचे पालक घेऊन येतात किंवा त्यांचे नातेवाईक बरोबर घेऊन येतात.
यात लहान मुले (३ ते ८),
वयात येत असलेली मुलेमुली (८-१२),
वयात आलेले नवतरुण (१३ ते १८),
वृद्ध स्त्री-पुरुष (६५ च्या पुढे)
यांचा ढोबळ मानानं समावेश करता येईल.
याशिवाय शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या परावलंबी 'कोणत्याही वयातील' व्यक्तीचा या गटात समावेश करता येईल.
त्यांच्या स्वभावातील, वागण्यातले त्रासदायक बदल कमी अथवा मध्यम अथवा अधिक तीव्रतेचे आणि वारंवारतेचे असू शकतात. या व्यक्तींमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण व्यक्तीचे पालक अथवा जवळचे नातेवाईक थेरपीस्टला सांगू शकतात. या जवळच्या व्यक्तींना जाणवलेला बदल हळुहळू होत गेलेला, कमीजास्त होणारा, अचानक दिसू लागलेला, घरातील अथवा हितसंबंधी लोकांच्या मदतीला फार दाद न देणारा असा असू शकतो.