आपण होऊन थेरपीसाठी येणारे लोक
आपण होऊन थेरपीसाठी येणार्या लोकांच्या लक्षात आलेलं दिसलं की त्यांना,
थेरपीस्टच्या सहाय्यानं स्वत:ला समजून घ्यावं अशी इच्छा असते,
त्यासाठी वेळ काढण्याची त्यांची तयारी असते,
स्वत:मध्ये विधायक बदल घडून यावा अशी काहीजणांची इच्छा असू शकते,
स्वत:च्या प्रगतीसाठी या व्यक्ती प्रयत्न करत दिसतात,
त्या स्वत: कमावत असतात अथवा त्यांना जवळच्या नातेवाईकांचा आर्थिक आधार असतो,
त्यांना गोंधळातून बाहेर पडायची इच्छा असते.
यामध्ये ..
- लग्न न झालेले नवयुवक (१८ ते २५),
- विवाहित तरुण-तरुणी (२६ ते ३५),
- अविवाहित तरुण-तरुणी,
- सुरुवातीच्या मध्यमवयीन कालखंडातील स्त्री-पुरुष (३६ ते ४५),
- नंतरच्या मध्यमवयीन कालखंडातील स्त्री-पुरुष (४५ ते ६५)
यांचा समावेश करता येईल.