बर्‍याच इच्छा आपण जन्माला येतानाच घेऊन येतो: पोट भरावं, उब मिळावी, हालचाल करता यावी, हवं ते मागता यावं, कोणाला तरी आपण हवंसं वाटावं, त्रास झाला तर सांगता यावा इ.

जसं वय वाढेल तसा आपला संपर्क अनेक माणसांशी येऊ लागतो, वस्तूंशी, परिस्थितीशी परिचय होऊ लागतो.

आपण आणि आपल्या भोवतालचं वातावरण यांच्यातल्या संबंधाचा परिणाम, आपल्या इच्छांवर होत जातो.

इच्छा व्यक्त केल्यानंतर किंवा इच्छेप्रमाणे वागल्यानंतर जर आपल्याल स्वीकारलं गेलं तर आपल्याला बरं वाटतं - ते बक्षीस आहे असं वाटतं.
आणि जर स्वीकारलं गेलं नाही तर आपल्याला वाईट वाटतं - ती आपल्याला शिक्षा वाटते.

बक्षीस हवसं वाटतं, शिक्षा नकोशी वाटते.

त्यानुसार आपण आपल्या इच्छा व्यक्त करायला किंवा मनात दडपायला शिकतो.