आत्मशोध-बोध आणि मनोबदल म्हणजे सायकोथेरपी

आत्मशोध-बोध आणि मनोबदल :

सायकोथेरपी या शब्दानं घाबरायला होतं, बावरायला होतं, नकोसं वाटतं, हे मान्य आहे. प्रत्यक्षात ही भीती कल्पनेची जास्त असते.

मी व्यवसाय करीत असलेली सायकोथेरपी ही नॉर्मल लोकांसाठी आहे. जगण्याचा खर्‍या अर्थानं शोध घेणार्‍यांसाठी मला काम करायला आवडतं.

आपले आपण स्वतःला शोधणं अवघड असतं.

थेरपीस्ट तुमचा आरसा असतो,

तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दाखवतो.

तुम्ही बोलत असलेलं तुम्हाला वेगळ्या भाषेत ऐकवतो.