इ-बुकविषयी
एका कळीची निगराणी
लेखिका: डॉ. ऋजुता विनोद
प्रथमावृत्ती: एप्रिल १९९४
मुखपृष्ठ : श्री. धनंजय सस्तकर
या पुस्तकाची आवृत्ती केंव्हाच संपली. गेली ८-९ वर्षे वाचक नवीन आवृत्तीची वाट पहात होते. या सर्व वाचकांचे मनापासून आभार. मात्र या पुस्तकाची हार्ड कॉपी न करता त्याचे इ-बुक करावे असा निर्णय या वर्षी मी व प्रसाद शिरगांवकरने घेतला. नूतन या सेवाभावी सहाय्यिकेचे तांत्रिक पाठबळ मिळताच अल्पावधीत हे पुस्तक तयार झाले.
या पुस्तकाची पाने स्कॅन केलेली आहेत. शिवाय आतमध्ये अनेक फोटोही घातले आहेत.
या पुस्तकाचे प्रकाशन ६ जुलै २००९ व्यासपौर्णिमेच्या रात्री श्री. सुरेशचन्द्र पाध्ये यांच्या हस्ते होईल.
पुस्तकाची किंमत रु. १०० मात्र ठेवलेली आहे.
हे पैसे तुम्हाला अनेक प्रकारे देता येतील-
१) या रकमेचा डी.डी किंवा मनीऑर्डर आमच्या पत्त्यावर करणे. सोबत आपला इ मेल देणे.
२) जे क्रेडिट कार्ड वापरतात किंवा पेपाल द्वारा व्यवहार करतात त्यांनी
खाली दिलेल्या बटनावर क्लिक करावे व आपले पैसे आमच्या नावावर जमा करावेत.
पैसे मिळताच आम्ही हे इ-बुक आपल्याला इ मेल करु.
धन्यवाद.