खुर्चीसाठी मारामारी
आपल्या मनात "मला हवं" असा हट्ट असणारा बालक, परवानगी देणारा, न देणारा पालक यांची सतत सत्तास्पर्धा चालू असते.
कधी आपण बालकाप्रमाणे वागतो तर कधी पालकाप्रमाणे.
आपल्यामधला प्रौढ समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो.
हे तीनही भाग आपल्या सर्वांच्या मनाचे अपरिहार्य हिस्से आहेत.
त्यामुळे कधीकधी एक लहान मूल पालकासारखं वागतं तर मोठं माणूस पोरकटासारखं वागतं.
आपल्या मनासारखं होणं, म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होणं याभोवती ही स्पर्धा फिरते.

