२) आपल्यातला पालक:(Super Ego)

अगदी लहानपणापासून

आपण आपल्या आसपासच्या वयानं मोठ्या माणसांकडून सतत विविध प्रकारच्या सूचना/आज्ञा ऐकत असतो.
हे कर, ते करु नको, असा वाग, तसा वागू नकोस इ.
शिक्षण, शिस्त, नेटकेपणा, जबाबदारीची जाणीव, व्यवहारओळख, आदर्शवादयश, काळजी (care), जोपासना या भोवती या सूचना फिरत असतात.
पालक दोन प्रकारचे असतात (T.A.)
a) समंजस, कनवाळू, मायाळू, क्षमाशील

b) करड्य़ा शिस्तीचे, कठोर, जरबेत, धाकात ठेवणारे, रुढी, परंपरा, समाज यांना अवास्तव महत्व देणारे, शिक्षा करणारे

शाळेत शिक्षक, कॉलेजात प्राध्यापक, नोकरीच्या ठिकाणी अधिकारी, मालक यांच्याशी आपला संपर्क येत जातो.

समाजात वावरताना विविध प्रकारचे नियम, शिक्षा यांच्याशी गाठ पडते.
त्यातून आपल्यामधला पालक घडत जातो.