गोंधळातून वाट कशी काढायची?
नेमकं काय करायचं? हा प्रश्न आपल्याला अगदी लहानपणापासून भेडसावतो.
कधी आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तर कधी आपल्या कल्पनेप्रमाणे समाजमान्य होणारा निर्णय घेतो.
आपला निर्णय कधी चुकतो तर कधी बरोबर येतो. काही काळ गेल्यावर आपला निर्णय कसा होता हे झालेल्या परिणामांवरुन कळुन येऊ शकतं.
मन शांत, स्वस्थ झाले तर आपला निर्णय बरोबर.
जर आपलं मन अधिकच अशांत, अस्थिर झालं तर निर्णय चुकला.
प्रत्येक आव्हानात्मक घटनांच्या वेळी निर्णय घेताना आपण याच प्रक्रियेतून जातो.
आपल्या मनाच्या जडण-घडणीनुसार आत्मघातकी निर्णय आपण घेतो की आपली उन्नती साधणारे घेतो, हे अवलंबून असते.
कितीतरी वेळा योग्य निर्णय कोणता घ्यावा हे कळ्त असूनही अयोग्य निर्णय आपण जाणून-बुजून घेतो, व अपयश ओढवून घेतो.
अशी अपयशाची मालिका आपण तयार करतो. या अपयशाचं खापर आपण परिस्थितीवर किवा आपल्यावर सत्ता गाजवणार्या माणसांवर फोडतो.
हे दुष्टचक्र जर थांबवायची इच्छा असेल तर आपल्याला कौंन्सेलिंगची मदत घेता येते.


