एका शरीरात, एका मनात अनेक माणसं रहातात
आपण जन्माला आलो की कोणाचं मूल, कोणाचं नातवंडं, कोणाचं पतवंड, कोणाचा भाचा, कोणाची पुतणी अशी नाती आपल्याला आपोआप चिकटतात.
पुढे शाळेत, कॉलेजात गेल्यावर, व्यवसायाला सुरुवात केल्यावर, लग्न झाल्यावर, आपण आईबाप, आजीआजोबा झाल्यावर, नाती वाढतच जातात.
शिवाय नात्यापलीकडे ओळखीची कितीतरी माणसं आपण जोडतो. वाणी, धोबी, सुतार, वेटर, प्लंबर, टेलर, नेहमीचे दुकानदार इ.
एखाद्यानं किती माणसं जोडली होती हे, तो मेल्यावर त्याच्या मयतीला आलेल्यांवरुन, नंतर हळहळणार्यांवरुन जाणता येतं.
अक्षरशः १०० एक विविध भूमिका आपण रोज निभावीत असतो.
रंगमंच बदलला की वेगळा आवाज, निराळा पोशाख, साजेसे पद इ.
तरीही आपल्याला प्रश्न पडतोच की नक्की मी कोण आणि कसा आहे?


