आपल्या अनंत इच्छा आणि त्या पुर्‍या करण्यातील आपल्या मर्यादा यांचे सततचे युध्द आपल्या मनात चालू असते.

आपली इच्छा आणि तिला बाहेरच्या जगातून मिळणारी अनुमती यांच्या एकत्रीकरणातून आपल्या इच्छा पुर्‍या होण्याची शक्यता वाढते. बाहेरून मिळणार्‍या मान्यतेवर आपली आपल्याविषयीची वाटणारी भावना अवलंबून असते.

बाहेरून अनुमती मिळाली नाही तर,मनात निराशा येते, राग येतो. हा राग कधी व्यक्त होतो तर कधी होत नाही.

मग या इच्छेचं काय करायचं?
- आपण इच्छा दाबून ठेवतो
- आपण आपली इच्छा कशी बरोबर आहे ते आपल्या भोवतालच्या माणसांना पटवण्याचा प्रयत्न करतो
- आपली इच्छा कोणाची अनुमती न घेता पुरी करण्याचा प्रयत्न करतो

या प्रवासात आपले दोन चेहरे तयार होतात-

१) आतला चेहेरा (ज्यात बाहेर न सांगितलेलं डबोलं असतं - खरेखरे आपण असतो!)

२) बाहेरचा चेहेरा (हा समाजात वावरण्यासाठी बनवलेला असतो - हा बदलता असतो, हा नकली असतो.)