आपलं मन आपल्याला कसं जाणवतं?

जागेपणी आपण कसे असतो? -

  • कधी स्थिर कधी अस्थिर अवस्था असते.
  • विविध भावनांची आंदोलनं चालू असतात.
  • विविध विषयांबद्दलचे विचार येत असतात.
  • निर्णय घेणं- न घेणं हे द्वंद्व चालू असतं.
  • एकाग्रता-समग्रता-चंचलता अशा विविध अवस्था असतात.
  • बरं वाटणं- न वाटणं असा बदल होत असतो.

स्वप्न पाहताना: स्वप्नं कशी वाटतात? -

  • विविध कालखंडातली
  • विविध रंगातली
  • विविध चित्रविचित्र घटनांची
  • काही सत्याला जोडलेली - काही काल्पनिक
  • ओळखीची-बिनओळखीच्या माणसांनी ये-जा केलेली
  • विविध भावना जागवलेली
  • काही सूचक
  • बरीचशी विस्कळीत
  • बरीचशी न आठवणारी

गाढ झोपेत काय होतं?
गाढ झोपेतून उठल्यावरच कळतं की आपण गाढ झोपलो होतो. फ़ार बरं वाटतं! ताजंतवानं वाटतं. नेहमी अशी झोप लागावी असं वाटून जातं. अशी गाढ झोप आपल्याला रोज का नाही लागत असा विचार येऊन जातो. ज्याला अशी रोज झोप लागते तो भाग्यवान.