डॉक्टर ऋजुता विनोद - थेरपीस्ट
डॊ. ऋजुता विनोद: कौन्सेलर व सायकोथेरपीस्ट
स्वीकृती कौन्सेलिंग व सायकोथेरपी सेंटरची स्थापना २५ डिसेंबर २००१ मध्ये झाली.
६०० शेहून अधिक जणांनी या सेवेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे.
माझी शैक्षणिक पार्श्वभूमी:
मी बी. जे मेडिकल कॉलेजमधून १९७८ साली एम.बी.बी.एस. केले. १९८३ साली एम.डी केलं.
मला हे शिक्षण घेत असताना मेरिट स्कॉलरशिप होती.
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी:
डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी माझे लग्न १९८३ मध्ये झाले. मला समन्वय व सनातन अशी दोन विशीतली मुले आहेत.
कौन्सेलिंगचे विशेष प्रशिक्षण:
वेल्लोर या तामिलनाडू राज्यातील शहरी ख्रिश्चन कौन्सेलिंग सेंटरमध्ये मी २००१ मध्ये मी कौन्सेलिंग व सायकोथेरपीच्या कामाचे विशेष प्रशिक्षण घेतले. याशिवाय मी दोन वर्षे सायकोथेरपीच्या विलक्षण अनुभवातून गेले. या शास्त्राचा सखोल अभ्यासही केला. त्यावर आधारीत ६० पेंटिंग्ज केली. या भक्कम अनुभवाच्या पाठबळावर मी काही निवडक व्यक्तींबरोबर सायकोथेरपीचे काम सुरु केले.
माझ्या कामाचे झालेले समाजाने केलेले कौतुक:
कर्तुत्ववान महिला हा पुरस्कार तीनवेळा मिळाला. चतुरा या लोकसत्तेच्या पुरवणीत मुलाखतही छापून आली होती. शुभदा पटवर्धनांच्या पुस्तकात ती समाविष्ट केली गेलेली आहे.
माझे सुरुवातीची व्यावसायिक पार्श्वभूमी:
१९८४ ते २००० पर्यंत मी योग थेरपीस्ट व योग प्रशिक्षक म्हणून काम केले.
१९८९ ते १९९५ या कालावधीत मी ज्ञान-प्रबोधिनीच्या प्रज्ञा-मानस-संशोधिकेत "समग्र मेधा विकास" या विषयावर संशोधन केले.
माझे काम विविध शास्त्रीय नियतकालिके, मासिके, बातमीपत्रे यातून प्रकाशित झाले आहे.
दूर-दर्शन व पुणे आकाशवाणीवर मुलाखती प्रसिध्द झाळ्या आहेत.
मी ४ पुस्तके, १ पुस्तिका, २ ब्लॉग्ज, ३ वेबसाईट लिहून प्रसिध्द केल्या आहेत.
