सायकोथेरपीला येण्यापूर्वी

पेशंटच्या मनात चाललेली उलघाल

लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाला कमी-जास्त ताण असतात.

प्रत्येकामध्ये व्याधी आणि आरोग्याची स्पर्धा चालू असते. सुख-दु:खाचा पाठशिवणीचा खेळ आपण खेळत असतो.

तरीही नेटानं आपण आपल्या परीनं आपल्या प्रगतीच्या दिशेनं प्रवास करीत असतो.

या प्रवासात अनेक प्रकारच्या अडथळयांशी आपली शर्यत असते.

सापशिडीच्या खेळासारखं कधी चार पावलं आपण पुढं जातो तर कधी दहा पावलं मागं येतो.

गरज वाटली तर आपण इतरांची मदतही घेत असतो.

शारीरिक तक्रारींच्या निवारणासाठी डॉक्टरांची मदत घेणं ही नेहमीची बाब आहे. ती समाजमान्यही आहे.