संपूर्ण आरोग्य
आरोग्य म्हणजे काय? आरोग्य याचा अर्थ साधारणपणे आपण शारीरीक आरोग्य असा घेतो. आरोग्य ही एक सर्वसमावेशक अनुभूती आहे... शरीर स्वस्थ, कार्यशील असणं, मन ताजंतवानं, उत्साही असणं, बौद्धिक कामं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करता येणं, आर्थिक स्थिती मजबूत असणं, स्वत:शी संवाद चालू असणं म्हणजेच अंतर्गत व्दंव्दाची जाणीव आपल्याला असणं, इतरांशी विधायक संवाद साधता येणं, स्वत:विषयी बरं वाटणं, मी माझ्यासाठी व इतरांसाठी उपयुक्त व्यक्ती आहे अशी प्रसन्न भावना असणं. हे सर्व एकत्रित अनुभवणं याला सर्वसमावेशक आरोग्य अशी संज्ञा आहे.